Shri Kshetra Naigaon
 
  श्री क्षेत्र नायगावला सिध्दनाथांची यात्रा  
 
 

पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नायगाव येथे चैत्र पौर्णिमा तथा हनुमान जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि. १९) श्री सिद्धनाथ महाराज व माता जोगेश्वरी देवीचा विवाह सोहळा मानाच्या शिखर काठ्यांच्या स्पर्धा आदी कार्यक्रम होणार आहेत.

गुरुवारी (दि. १८) सायंकाळी ७ वाजता येथील मंदिरात श्री सिध्दनाथ महाराज व माता जोगेश्वरी देवी यांच्या मूर्तीना हळद लावण्याचा कार्यक्रम होणार आहे; तर यात्रेच्या मुख्य दिवशी शुक्रवारी (दि. १९) पहाटे ५ ते ६:२० वाजेपर्यंत ह. भ. प. दत्तात्रय महाराज सुळसकर यांचे हनुमान जयंतीनिमित्त कीर्तन, ठीक ६वाजून २१ मिनिटांनी हनुमान जयंती उत्सव आणि सकाळी ७ वाजता 'श्री' ची महाआरती होणार आहे. यानंतर ७:३० ते ११:३० पर्यंत उत्सव मूर्तींची पालखीतून सवाद्य ग्रामप्रदक्षिणा होणार असून, दुपारी १२ ते ४ पर्यंत भक्तांची नवसाची दंडवते होणार आहे. सायंकाळी ६ते ७:३० पर्यंत सासवड, पेरणे, एलकेभाद्रे, पारगाव, सिंगापूर, एखतपूर - मुंजवाडी, न्हावरे, भोंडवेवाडी, कोथळे आदी गावांतील मानाच्या काठ्यांचे स्वागत, ७:३० वाजता 'श्री' ची महाआरती व त्यानंतर सायंकाळी ७:४५ वाजता यात्रेचा मुख्य कार्यक्रम म्हणजे शिखर काठ्यांच्या स्पर्धा होणार आहेत. ८ते १० वाजेपर्यंत अन्नपूर्णा ट्रस्टच्या वतीने महाप्रसाद आणि रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत 'श्री'च्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा आणि छबिन्याचा कार्यक्रम होईल.

शनिवार (दि. २०) सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत कै. हिराबाई डोंगरे लोकनाट्य तमाशा आणि दुपारी ४ते रात्री ८वाजेपर्यंत कुस्त्यांची जंगी आखाडा रंगणार असून, रात्री ९ ते पहाटे २ वाजेपर्यंत पुन्हा लोकनाट्य कार्यक्रम होणार असल्याची माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट व यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली.

 
 
 
Antarbhag Bhavik Dev
Gabhara Jogeshwari Kalbhairav